जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती वाघ नगर तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीची सुरुवात जिजाऊ नगर बुद्ध विहार पासून करण्यात आली तर सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा जळगाव स्टेशन या ठिकाणी करण्यात आले.
या उत्सव समितीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते ८० ते १०० महिलांचे लेझीम पथक . भिम गीतांच्या चालीवर ठेका धरत महिलांनी लेझिमचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण या मिरवणुकी मध्ये केले. पांढऱ्या निळ्या रंगाच्या पोषाखामध्ये निळे फेटे परिधान केलेले लेझीम पथक अतिशय मनमोहक वाटत होते.त्यात लहान चिमुकल्या मुलांच्या लाठीकाठी चेही प्रदर्शन या वेळी पाहण्यास मिळाले. मिरवणुकी मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत प्रथम क्रमांकाचे मानकरी हे लेझीम पथक ठरले.सर्वांना प्रशिक्षक योगेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले तर मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी सर्व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.