जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने फाळणी दिनानिमित्त आज रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सिंधी कॉलनी येथून ‘मशाल मूक रॅली’ काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी करण्यात आली. याच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मशाल मुक रॅली काढण्यात आली.
यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मशाल मूक रॅली ही सिंधी कॉलनी, नेत्र ज्योती हॉस्पिटल, जुनी जोशी कॉलनी, सप्तशृंगी माता मंदिर, नवीन जोशी कॉलनी, बाबा हरदासमल मंगल कार्यालय आणि पुन्हा सिंधी कॉलनी अशी काढण्यात आली होती.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, माजी महापौर भारती सोनवणे, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका दीप्ती काळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी महानगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.