Home Cities जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल मोटारसायकल रॅली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल मोटारसायकल रॅली

0
39


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालय येथून रविवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मशाल मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने मशाल मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली.

ही रॅली महाराणा प्रताप पुतळा, बहिणाबाई उद्यान, गणेश कॉलनी, ख्वॉजामियॉ परिसर, कोर्ट चौक, नेहरू पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, टॉवर चौक, सुभाष चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि स्वातंत्र्य चौकातील महात्मा गांधी उद्यानात समारोप करण्यात आला.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, इजाज मलिक, अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी, मजहर पठाण, इब्राहिम तडवी, भगवान सोनवणे, राजु मोरे, किरण राजपुत, सुशील शिंदे, रमेश बारी, विशाल देशमुख, डॉ. रिजवान खाटीक, रहीम तडवी, रफीक पटेल, रितेश लाडवंजारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound