राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यावे – प्रा.डॉ. सुनिल नेवे

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे हलविण्यात आल्याने भुसावळ शहरातील राजकीय क्षेत्रात मोठा भुकंप झाला. सत्ताधारी व विरोधक एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करीत आहे. प्रशिक्षण केंद्र दुसऱ्या जिल्हात गेल्याने जळगाव जिल्हावर मोठा अन्याय झाला आहे. सर्वांनी राजकिय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे भावनिक आवाहन भाजपचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. सुनिल नेवे यांनी आज शहरातील लोणारी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत केले.

राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथे हलविल्याने विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यावर टिका करीत सावकारे हे अकार्यक्षम आमदार असल्याचे पत्रकार परीषदेत म्हटले होते. त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आज शहरातील लोणारी मंगल कार्यालयात भाजपाने पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपाचे जिल्हा संघटक प्रा. डॉ. सुनिल नेवे यांनी आमदार संजय सावकारे हेच कार्यक्षम आमदार असल्याचा दावा करीत त्यांनी राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी किती प्रयत्न केले याचा खुलासा केला.

भाजपाचे स्व.गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री एकनाथराव खडसे व तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांच्याहस्ते पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भुमीपुजन झाले होते. मात्र २००४ ते २००९ च्या दरम्यान माणिकराव ठाकरे हे गृहमंत्री असताना त्यांनी हा प्रकल्प पळवून नेला. असे प्रा. डॉ.सुनिल नेवे यांनी म्हटले आहे. तेव्हा भाजपाचे जेष्ठ नेते नाथाभाऊ व संजय सावकारे यांनी राज्य राखीव पोलीस केंद्रासाठी प्रयत्न केले व त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली . होती तेव्हा वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली असेही सुनिल नेवे यांनी सांगितले. २००४ ते २००९ पर्यंत संतोष चौधरी हेच आमदार होते. मात्र त्यांनी राज्य राखीव पोलीस केंद्रासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नसल्याचा आरोप सुनिल नेवे यांनी यावेळी केला आहे. विद्यमान आमदार संजय सावकारे हेच कार्यक्षम आमदार होत असा विश्वास सुनिल नेवे यांनी केला आहे. या बैठकीला नगराध्यक्ष रमण भोळे, न.पा. गटनेता हाजी मुन्ना तेली, शहराध्यक्ष दिशेने नेमाडे, युवराज लोणारी, पिंन्टु कोठारी, किरण कोलते, वसंत पाटील, राजेंद्र आवटे, पवन बुंदले, ॲड. बोधराज चौधरी, अजय नागराणी, हाजी शफि पहेलवान, देवा वाणी, परिक्षित बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

Protected Content