Home Cities जळगाव जळगावातील घटनेवर चित्रा वाघ यांचाही संताप ( व्हीडीओ )

जळगावातील घटनेवर चित्रा वाघ यांचाही संताप ( व्हीडीओ )

0
44


 

मुंबई : वृत्तसंस्था । जळगाव शहरातील आशादीप निराधार महिला वसतिगृहातील घटनेवर भाजप नेत्या  चित्रा  वाघ यांनीही संताप व्यक्त केला आहे .

माध्यामांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या कि त्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स माझ्याही पाहण्यात आल्या  आहेत . पोलीस आणि बाहेरची माणसे येऊन तिथे त्या मुलींना नग्न होऊन नाचायला भाग पाडत आहेत हा संतापजनक प्रकार होत असताना तेथील रंजना झोपे नावाची महिला अधिकारी त्या मुलींना वेगवेगळया प्रकारचा त्रास देत आहे ज्येष्ठ महिला अधिकाऱ्याकडून या घटनेची चौकशी सुरु असल्याचे तेथील पोलीस अधीक्षकांनी मला सांगितले पण एफआयआर दाखल झालेला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुनांप्रमाणे अशा घटनेत पोलिससुद्धा स्वतः दखल घेऊन फिर्याद दाखल करून घेऊ शकतात    तसे याबतीत का झाले नाही ? , हा माझा पोलिसांना प्रश्न आहे . राज्यातील परिस्थिती पाहता या प्रश्नाच्या उत्तरासाठी मला पोलीस महासंचालक किंवा गृहमंत्र्यांकडे जावे लागले तरी मी  जाईन , असेही त्या म्हणाल्या .

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/186887072854920

 


Protected Content

Play sound