ओम लोहार याची राज्यस्तरीय मिनी व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड  

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे मिनी राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुलांची चाचणी परिक्षा घेण्यात आली.

दि. २४ एप्रिल रोजी नागपूर येथे मुले / मुली (१४ वर्षाखालील) यांची चाचणी परिक्षा घेण्यात आली. मिनी व्हॉलीबॉल स्पर्धा या नागपूर येथे दि. ७ मे २०२२ ते ९ मे २०२२ दरम्यान समर्थ व्यायाम शाळा, प्रतापनगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

सदर स्पर्धेत नाशिक विभागीय संघ सहभागी होणार आहे. या संघात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, पाचोरा मधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी ओम फनेंद्र लोहार याची निवड झाली आहे. ओम लोहार यास प्रशिक्षक आकाश महालपुरे योग्य मार्गदर्शन करत आहेत.

या प्रसंगी जिल्हा पातळीपासून ते विभागीय पातळीपर्यंत प्राविण्य मिळविल्याबद्दल व राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल स्कुलचे प्राचार्य प्रेम शामनाणी, मुख्याधपिका कल्पना वाणी, अमिना बोहरा व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्यातर्फे ओमचा पालकांसोबत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!