लाडकूबाई विद्या मंदिरात राजर्षी शाहू महाराज यांचा अभिवादन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील लाडकूबाई विद्या मंदिरात आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासह राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

आज कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु. मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी इ ५ वी स्कॉलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन करून पात्र झाल्याबद्दल चि दर्शन विठ्ठल पाटील तसेच सरळसेवा परिक्षेअंतर्गत जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कु साक्षी संजय देशमुख व भुमी अभिलेख विभागात भुकरमापक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कु जागृती लक्ष्मण सावंत आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कु सृष्टी सुभाष आहिरे या विद्यार्थ्यांनींचा पालकांसमवेत गुणगौरव व सत्कार संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक जी. एन. पाटील व पर्यवेक्षक पी. जी. सोनवणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली पाटील यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करुन गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

सदर कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, लाडकूबाई प्राथमिक चे मुख्याध्यापक कमलेश शिंदे, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील; उपप्राचार्य बी जे पाटील, पर्यवेक्षक पी जी सोनवणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षीका श्रीमती सीमा सैंदाणे व सूत्रसंचालन श्रीमती वैशाली देवरे आणि आभार प्रदर्शन दिपक भोसले यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content