बापरे : पाचोर्‍यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात जणांविरूध्द गुन्हा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील १४ वर्षीय युवतीवर सात तरूणांनी विनयभंग करत शारिरिक सबंध केल्याने पिडित युवतीला गर्भधारणा झाली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी सात जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आसुन त्या सात जणांसह तीन संशयितांना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाचोरा पोलिसांकडुन या प्रकरणी मिळालेली माहीती अशी की, सदर पिडित तरूणी ही २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघुन गेली होती. २८ एप्रिल रोजी तीच्या आजीने नात बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी सदर युवतीचा शहरभर शोध घेतला असता ती २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरिल एका हॉटेलमध्ये जेवण करतांना आढळुन आली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी तीची चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समीतीकडे रवानगी केली.

दरम्यान बाल कल्याण समीती येथील प्रशासकिय यंञणेने सदर युवतीची वैद्यकिय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी पाचोरा पोलिसांना याची माहीती कळवली. विजया विसावे यांनी जळगाव येथे जाउन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने तिच्यावर जी आपबीती घडली याचे कथन केले.

यात पिडितेने सुमित कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरूणणांनी वेळोवेळी विनयभंग करित शारिरिक सबंध केल्याचे सांगितले. घडलेली घटनास्थळ आणी घटनेतील आरोपींना ओळखण्यासाठी पिडित युवतिला पाचोरा पोलिसात आणले असता तिने सातही तरूणांची ओळख पटवली तसेच या प्रकरणात अजुन तिन तरूण पोलिसांनी संशयित म्हणुन ताब्यात घेतले आहे.

Protected Content