अरे बापरे ! एरंडोल येथील एकाची शेती खरेदीच्या नावाखाली ८४ लाखाची फसवणूक

जळगाव/एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथील एलआयसी एजंटचा व्यवसाय करणाऱ्या ७१ वर्षीय व्यक्तीला शेतजमीन खरेदी विक्री व्यवहारातून तीन जणांनी एकुण ८४ लाख ५० हजाराची फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाईसाठी हा गुन्हा आर्थीक शाखेत वर्ग करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, “रघुनाथ शंकर निकुंभ (वय-७१) रा. सरस्वती कॉलनी एरंडोल हे एलआयसी एजंटचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे आनंद रामदास चौधरी उर्फ छोटू भगत रा. जहांगीर पुरा एरंडोल आणि राजेंद्र अमृत धनगर रा. खेडगाव ता.एरंडोल या दोन इस्टेट ब्रोकरची ओळख निर्माण झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला. यामध्ये आनंदा चौधरी याचा मित्र राजू धनगर यांच्या मालकीची गट नंबर ९१/१ मधील जमिनीचे खरेदी केली. याव्यवहारा नंतर रघुनाथ निकुंभ यांचा आनंदा चौधरी व राजेंद्र धनगर याच्यावर विश्वास संपादन झाला. त्यानुसार त्यांनी दोघांच्या सांगण्यावरून एरंडोल तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १२ जमीनींचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला आहे. काही जमिनीमध्ये आनंद चौधरी व त्यांची पत्नी संगीता चौधरी आणि त्याचा मुलगा प्रकाश चौधरी असे काही ठिकाणी सामायिक भागीदार आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये रघुनाथ निकम यांचे ७ लाख उधारीचे पैसे आनंदा चौधरी यांच्याकडून घेणे असल्याकारणामुळे आनंदा चौधरी याने सामायिक शेतातील जमिन ही रघुनाथ निकुंभ यांच्या मुलाच्या नावावर करून देण्याच्या बहाण्याने खरेदी केला. परंतु ६ महिनेपर्यंत ७/१२ उताऱ्यावर मुलाचे नाव लागले नाही म्हणून त्यांनी चौकशी केली असता प्रांताधिकारी कार्यालयात आनंद चौधरी याने ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदणी न करण्याचे बाबत अर्ज दिला होता. याबाबत जाब विचारला असता आनंद चौधरी याने ही जमीन त्यांचीच असल्याचे सांगून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार त्यांनी याआधी केलेले व्यवहार पडताळून पाहिले असता बऱ्याच व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

गट नंबर १००/२ मधील अपहार

रघुनाथ निकुंभ यांना सप्टेंबर २०१९ मध्ये आनंदा चौधरी याने एरंडोल म्हसावद रस्त्यावर असलेला त्याचा मित्र राजेंद्र धनगर याचा भाऊ निंबा अमृत धनगर यांची रोडलगतची जमीन विक्री असल्याचे सांगून व्यवहार करण्यास सांगितले. त्यानुसार निकुंभ यांनी शेतर जमीन निंबा धनगर यांच्याकडून आनंदा चौधरी यांच्या सामाईक भागीदारीने पत्नीच्या नावे खरेदी केले. या पोटी निकुंभ यांनी १७ लख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर एकाच महिन्यात आनंदा चौधरी याने पुन्हा निंबा धनगर हा उर्वरित ४० आर जमीन देखील विक्री करत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी आधीच्या जमिनीच्या बाजूलाच असल्याकारणामुळे २० लाख रुपयांची असल्याबाबत कळविले. त्यानुसार निकम यांनी जमीन चांगली असल्याचे सांगून २० लाख रुपये रोख स्वरूपात (४० आर) जमीन खरेदी केली. दरम्यान या व्यवहार करण्यापुर्वी आनंद चौधरी, राजेंद्र धनगर व उमेश पाटील यांनी कच्चे खरेदीखत दाखवले होते. परंतु मूळ खरेदीच्या दिवशी मुळखरेदीखत मध्ये मजकूर बदलून खरेदी करून घेतली. आनंद चौधरी यांनी पहिला खरेदीचा व्यवहार करताना ५० टक्के भागीदार होण्यासाठी त्याने देखील साडेसतरा लाख जिल्ह्याचे निकम यांना भासविले, परंतु जमिनीचे मूळ मालक निंबा धनगर यांना सदरची जमीन ही ४ लाख ५० लाखात विक्री केल्याचे समजले आणि त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी ८० आर जमिनीतील सामायिक भागीदारी असलेली जमीन राजेंद्र चौधरी याने निकुंभ यांना न सांगता दिलीप देविदास चौधरी रा. तामसवाडी यांना २० लाखात परस्पर विक्री केली. या व्यवहारात निकुंभ यांची ३७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली. 

गट नंबर १५० मधील अपहार

फेब्रुवारी २०२० मध्ये आनंदा चौधरी याचा मित्र राजेंद्र धनगर याच्या खेडगाव ता. एरंडोल शिवारात गट नंबर १५० मधील महारू वंजारी यांची रोड लगतची (७३ आर) जमीन विक्री असल्याबाबत सांगितले. हा व्यवहार ४० लाख रूपयाचा असल्याचे सांगितले. या व्यवहारात आनंद चौधरी भागीदार होत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी निकम यांनी जमिनीपैकी ३६.५ आर जमीन २० लाख रुपये भरून खरेदी केली होती. व उर्वरित (३६.५ आर) जमिन आनंद चौधरी याने २० लाख रुपये भरून खरेदी केल्याचे भासवून जमिनीत भागीदारी केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये आनंद चौधरी यांच्याकडे निकम यांचे ७ लाख रुपये घेणे बाकी असल्याकारणामुळे परत करण्याबाबत विचारले असता त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगून गट नंबर १५०/१/२ मधील सामाईक जमीन मुलाचे नाव करून देतो असे सांगितले. परंतु मूळ मालक महारु वंजारी निकुंभ यांनी खात्री केली असता ही जमीन ३ लाख रुपयात आनंद चौधरी यांच्याकडे गहाण ठेवल्याची माहिती मिळाली. आनंद चौधरी याने निकम यांची या व्यवहारात देखील २७ लाख रुपयांची फसवणूक केली.

एरंडोल येथील बखळ प्लॉट नंबर ६ अ गट नं. १०५१ मधील अपहार

सन २०१९ मध्ये आनंद चौधरी याने निकुंभ यांना पुन्हा एरंडोल येथील धरणगाव रोडवरील विद्या नगर येथे रस्त्यालगत प्लॉट दाखवून ३० लाख रूपयांचा व्यवहार असल्याचे सांगितले. प्लॉट त्याने ३० लाख रुपयात त्याची पत्नी संगीता चौधरीचे नावे खरेदी केले सांगितले. परंतु प्लॉटची मूळ मालक यांना पैसे देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून भागीदारी होण्याबाबत विनंती केली म्हणून निकुंभ यांनी १५ लाख रुपये देऊन प्लॉटमध्ये भागीदारी होण्यास संमती दिली आणि खरेदी केली. परंतु व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीची चाचपणी केली. यामूळ मालक विलास गोकुळ पाटील यांना चौधरी त्याने शेजारचा प्लॉट खरेदी करून देण्याचा बहाण्याने त्यांच्या रहिवास असलेला प्लॉट स्वतःच्या पत्नीच्या नावे करून घेतला आणि  १५ लाख रुपये घेऊन मला त्यात भागीदारी करून घेतल्याचे लक्षात आले. या व्यवहारात देखील निकम यांची एकूण १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

या वरील तीनही व्यवहारात निकुंभ यांची ८४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत निकुंभ  यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आनंदा रामदास चौधरी, राजेंद्र अमृत धनगर आणि मध्यस्थी म्हणून असलेला वेंडर उमेश श्रीराम पाटील यांच्याविरोधात तीनही व्यवहारांमध्ये बनावट खरेदी खत तयार करून फसवणूक करून एकूण ८४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content