जनहितार्थच्या कामात अधिकारी प्रतिसाद देत नाही : रावेरात भाजपाची आगपाखड (व्हिडिओ )

 

रावेर,  प्रतिनिधी ।  कोरोना व्हायरसच्या उपाय-योजनेसाठी केंद्रीय समिती जिल्हात असतांना रावेरात मात्र सोई-सुविधा मिळत नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे करत अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार केली.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह  जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी  कोविड सेंटर भेट दिली असता त्यांनी तहसीलदारांच्या  कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केली.  केंद्रीय समिती जिल्ह्यात असतांना तहसीलदार  कोरोना पेशंट संदर्भात कॉल घेत नाही,  आम्ही आमच्या घरीची कामे सांगत नाही असा संताप व्यक्त करण्यात आला.  जनहिताचे कामे करायला जर अधिका-यांकडून  प्रतिसाद मिळत नसेल तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार करण्याची विनंती जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे करण्यात आली. 

यावेळी अध्यक्षा रंजना पाटील यांनी रावेर तालुक्याला भेट देण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करतांना सांगितले की, पदाधिकारी यांनी रावेर तालुक्यात वाढते मरणाचे प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती. याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी भेट दिली आहे. भाजपाचे कार्यकर्ते हे डॉक्टरांना सहकार्य करत आहेत तरी डॉक्टरांनी त्यांचे फोन घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वांनी काळजी घ्यावी, मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदीचे पालन करावे असे आवाहन केले.

 

यांची होती उपस्थिती 

दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या सोबत भाजपाच्या जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन,पंचायत समिती सभापती कविता कोळी,गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल,वैद्यकीय अधिकारी डॉ एन डी महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, संदीप सावेळे हरलाल कोळी, सरपंच महेंद्र पाटील,आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आम्ही आमच्या घरची कामे सांगत नाही..

यावेळी  पंचायत समिती सभापती कविता कोळी व भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील व बीडीओ दिपाली कोतवाल यांच्या समोर येथील स्थानिक महसूली अधिकारी आमचे जनहिताच्या कामे सांगितल्या प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आम्हाला कामे करायला प्रचंड अडचणी येत असल्याची  भावना व्यक्त केली. तर संपूर्ण कैफीयत  आम्ही भाजपा समिती  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे मांडणार असल्याचे अध्यक्षा सौ. पाटील सांगताच संतापाचे प्रकरण शमले

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/250426823454943

 

Protected Content