राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र रक्षक तैनात !

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांनी महाराष्ट्र रक्षक या नावाने पथक तयार केले आहे.

राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय अलीकडेच महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, यात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना मिळणारी झेड दर्जाची सुरक्षा काढून या नेत्यांना आता वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकेचं लक्ष्य केले होते. यातच राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यावरून मनसे नेत्यांनी ठाकरे सरकारवर केली होती. या अनुषंगाने आता मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी पुन्हा सरसावले आहेत.

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेच्या महाराष्ट्र रक्षक पथकाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र रक्षक नावाने टी-शर्ट छापून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना संरक्षण देणार आहेत.

Protected Content