अरेच्चा आता शेण-मातीच्या मिश्रणाचा पेंट उपलब्ध !

नवी दिल्ली । शेण-मातीच्या मिश्रणाने अजूनही ग्रामीण भागात अनेक जण घरे सारवतात. आता हेच मिश्रण पेंटच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध झाले असून नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे लाँचींग करण्यात आले आहे.

खादी व ग्रामोद्योग महामंडळाने गाईचे शेण आणि मातीच्या मिश्रणापासून वैदीक रंग पयार केला असून आज याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लाँचिंग करण्यात आले आहे. हा रंग डिस्टेंपर आणि इमल्शन यामध्ये खरेदी करता येणार आहे. हा रंग इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टिरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल असेल. विशेष म्हणजे हा रंग वाळण्यासाठी फक्त चार तास लागतात. य

वैदीक हा नैसर्गिक रंग शेणापासून बनला असला तरी त्याचा अजिबात दुर्गंध येत नाही. तसेच यामध्ये कोणत्याही रसायनांचा वापर केलेला नाही. भारतीय मानक ब्युरोने वैदिक पेंटला प्रमाणित केलं आहे. सध्या हा रंग २ लीटरपासून ३० लीटरपर्यंत डब्ब्यात पॅकिंगमध्ये करण्यात आला आहे.

Protected Content