‘इस्रो’ प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर; मोदींकडून गळाभेट देऊन सांत्वन

Modi8564

 

बंगळुरू (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंदी यांनी शनिवारी सकाळी इस्त्रो सेंटरमध्ये पोहोचून शास्त्रज्ञांची भेट घेतली. या भेटीनंतर मोदी मुख्यालयातून बाहेर पडत असताना इस्त्रो प्रमुख सिवन यांना अश्रु अनावर झाले. सिवन यांची अवस्था पाहताच मोदींनी गळाभेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

 

आज सकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या कंट्रोल रुमला भेट देत देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवणारे भाषण केले. मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. निराश होऊ नका. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोगच, असे मोदी म्हणाले. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असे म्हणत मोदी यांनी उपस्थित सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला. भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी कंट्रोल रुपमध्ये फिरले. प्रत्यकाच्या हाताशी हात देत मोदींनी सर्वांचे अभिनंदन, कौतुक करत धीर दिला.

Protected Content