जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या एम.एड. विद्यार्थ्यांच्या आंतरवासियता नुतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालयात सुरु झाली आहे. शिक्षणशास्त्र विभागाच्या आंतरवासियता उपक्रमाचे उद्घाटन नुतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालयाच्या प्राचार्या शशिकला सोनवणे यांनी केले.
एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्वानुसार एम.एड. अभ्यासक्रमात आंतरवासियता समाविष्ट केली असून एम.एड. विद्याथ्र्यांना तीस दिवसाच्या कालवधी करिता आंतरवासियता करावी लागते. या उपक्रमाचे समन्वयक धर्मेंद्र जाधव आणि जयश्री शिंगाडे हे आहेत. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख डॉ.मनीषा इंदाणी यांनी नियोजन केले आहे. यावेळी नुतन मराठा विद्यालयातील प्रा.डी.आर.पाटील, प्रा.एस.वाय.नन्नवरे, प्रा.पी.व्ही.गायकवाड, प्रा.निळे, प्रा.आर.एस.पाटील, प्रा.एस.बी. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.संतोष खिराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश कचरे यांनी तर आभार पूनम मसाने यांनी मानले.