कृती फाऊंडेशनतर्फे गरजुंना किराणा किटचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या फैलावामुळे देशभरात कोरोनग्रस्तांची संख्या वाढते आहे. १७ मे पर्यंत लॉकडाउन असून,नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जळगावात देखील कृती फाऊंडेशनतर्फे गरजुंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

जळगाव देखील रेडझोनमध्ये असून, कृती फाऊंडेशनतर्फे शहरातील गोर गरीबांना १० ते १५ किराणा किटचे वाटप करण्यात आले. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हमाली व धुणे भांडेचे काम करून आपला उदरनिर्वाह करनाऱ्यांचा रोजगार पूर्ण पणे बंद झाला आहे. सामाजिक बांधीलकी जपत कृती फाऊंडेशनतर्फे रामेश्वर कॉलनी येथे गोरगरीबांना महिनाभर पुरेल अशा किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास कृती फाऊंडेशन संस्थाचे अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content