भुसावळात रा.स्व.सं.तर्फे आज नवरात्रीनिमित्त कार्यक्रम

navratr

भुसावळ प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता, संतोषीमाता हॉल, प्रोफेसर कॉलनी येथे सालाबादप्रमाणे यंदा ही नवरात्री (विजयादशमी) उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० वाजता अहिल्यादेवी कन्या विद्यालयातून पथसंचलन निघणार आहे. यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी उत्सवात सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन शहर संघचालक डॉ. विरेंद्र झांबरे यांनी केले आहे.

Protected Content