आता ‘नो-बॉल’चा निर्णय थेट तिसऱ्या पंचांकडे

No Ball

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेत बाजी मारल्यानंतर भारताची ‘विराट’सेना विंडीजविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. सामना फिरवणारे नो बॉलच्या काही निर्णयांवरून आयसीसीने एक छोटा बदल केला असून नोबॉलची जबाबदारी थेट तिसर्‍या पंचाकडे देण्यात आली आहे. आज पासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत प्रयोगाची चाचणी केली जाईल आणि जर ती यशस्वी झाली तर भविष्यात या पद्धतीचा विचार केला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० तसेच वनडे मालिकेत गोलंदाजाचा पाय क्रीझबाहेर पडल्यामुळे देण्यात येणारा नोबॉल मैदानातील पंचाकडून नव्हे तर तिसऱ्या पंचाकडून दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत तीन टी-२० सामने होणार असून तेवढ्याच वनडे लढतीही होतील. हैदराबाद येथे शुक्रवारपासून या मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेत हे तंत्र प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे.

आयसीसी म्हणते की, या संपूर्ण सामन्यात गोलंदाजाने टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर तिसऱ्या पंचांचे लक्ष असेल. त्याचा पाय क्रीझमध्ये आहे की बाहेर हे पाहण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचाची असेल. जर त्यांना नोबॉल असल्याचे वाटले तर ते मैदानावरील पंचांशी संपर्क साधतील आणि मैदानावरील पंच नोबॉल जाहीर करेल. एकंदरीतच मैदानावरील पंच नोबॉलची घोषणा स्वतःहून करणार नाही. तिसऱ्या पंचांशी त्याला सल्लामसलत करावी लागेल.

Protected Content