धरणगाव नगरपालिका निवडणुकी संदर्भात काँग्रेसची बैठक

dharangaon 1

धरणगाव प्रतिनिधी । शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगरपालिका पोटनिवड संदर्भात महत्त्वाची बैठक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.

 

मिटिंग दरम्यान नुकतीच होऊ घातलेल्या धरणगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यात आले. धरणगाव शहरातून नगराध्यक्षपदासाठी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सम्राट परिहार दीपक जाधव, अरुणा कंखरे, सुरेश भागवत व रामचंद्र माळी यांनी निवडणूक लढवण्यास संदर्भात पक्षाकडे मागणी केली असून काँग्रेसने निवडणूक लढवावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. तसेच याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक लढू, अशी इच्छा व्यक्त केली. या बैठकीला तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे, महेश पवार, बापू जाधव, नंदा महाजन, सुरेश सिंग चव्हाण, चंदन पाटील, विजय जनक वार, मनोज कंखरे, कल्पेश महाजन, वाल्मीक पाटील व इतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content