राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खडसे महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धे साठी पुरुष व महिला गटासाठी 5 की. मी. अंतर असेल.

सदर स्पर्धा या 29 ऑगस्ट रोजी 7:30 वाजता महाविद्यालया जवळून सुरू होणार आहे. स्पर्धेत विद्यार्थी व नागरिक नाव नोंदवून भाग घेऊ शकतात. नोंदणीची अंतिम तारीख 27 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे.

तरी इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्र प्राचार्य डॉक्टर हेमंत महाजन यांनी केले आहे. प्रथम 100 स्पर्धकांना मोफत टी-शर्ट मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगर कडून देण्यात येईल तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूस सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येईल.

तसेच सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. स्पर्धेची सुरुवात अँड. रोहिणीताई खडसे खेवलकर हिरवा झेंडा दाखवून करतील.

स्पर्धेचा मार्ग गजानन मंदिर- परिवर्तन चौक- बस स्टॅन्ड – बोदवड चौफुली- परिवर्तन चौक- गजानन मंदिर असा असेल स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रतिभा ढाके .9423589831 व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे – 9423914371 यांच्याशी संपर्क साधावा.

Protected Content