मराठमोळे उदय लळीत भारताचे सरन्यायाधिश

 

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठमोळे उदय लळीत यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधिशपदाचा कार्यभार सांभाळला आहे.

देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्रीदेखील उपस्थित होते. न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

न्या. उदय लळीत यांनी १९८३ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीत सुरूवात केली होती. १९८५ पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. सरन्याधीशपदाची जबाबदारी स्वीकारणे उदय लळीत हे चौथे मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. याआधी पी.बी. गजेंद्रगडकर, यशवंत चंद्रचूड आणि शरद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च स्थान भूषवले होते.

Protected Content