आता बोंबला : दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखांची रोकडची चोरी !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील हार्डवेअर दुकानासमोर पार्कींगला लावलेली दुचाकीच्या डीक्कीतून अडीच लाख रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी २३ जून रोजी दुपारी १२.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिपक धोंडू चिंचोरे वय ५१ रा. म्हसावद ता. जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार २३ जून रोजी दिपक चिंचोरे हे कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी चौकातील हार्डवेअर दुकानासमोर पार्क करून लावली होती. त्यांनी कामासाठी लागणारे अडीच लाख रूपयांची रोकड डिक्कीत ठेवलेली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ही रोकड चोरून नेली. डीक्कीतून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २५ जून रोजी रात्री ९.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.

Protected Content