पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव – औरंगाबाद महामार्गावर अवैध विनापरवानगी बायोडिझेल विक्री होत असल्याची बातमी काल ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूजला प्रकाशित होताच आज तेथील साहित्य गायब झाले मात्र संबंधित अधिकारी तेथे पोहोचलेच नसल्याची चर्चा पहूर परिसरात सुरू आहे.
जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पहूर येथून काही अंतरावर बालाजी तोल काट्याजवळ अवैध विनापरवानगी बायोडिझेल विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरू आहेत. अशा स्वरूपाची बातमी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’ने प्रकाशित केली होती; तसेच तोल काट्याजवळील खोलीच्या ओट्यावर पंप आहेत तर बाजूला टँकर उभे असून बाजूने पाईपलाईन करण्यात आली असल्याचा उल्लेख बातमी करण्यात आला होता.
बातमी प्रकाशित झाली आणि या ठिकाणावरील पंपसह टॅंकर पण गायब करण्यात आला आणि पाईपलाईन काढण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तेथे पोहोचलेच नसल्याची चर्चा पहूर परिसरात आज दिवसभर सुरू असून सर्वसामान्य नागरिकांमधून संतापही व्यक्त केला जात आहे.
आता फक्त त्या ठिकाणी जमिनीतली टाकी असून वरती जमिनीबाहेर पाईप असल्याचे दिसून येत आहे. त्यातील संबंधित विभागाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत असून यांच्या पाठीशी कोण अधिकारी व कर्मचारी आहेत ? याचाही शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.