सुरभी वार्षिक सभा व गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सुरभी बहुद्देशिय महिला मंडळातर्फे आज वार्षिक सभा घेण्यात आली. सभेनंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले. सचिव मंजुषा राव यांनी अहवाल आणि वर्षभरातील जमाखर्च वाचून दाखविला तर अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनीनी वर्षभरातील कार्यक्रमांवर चर्चा केली.

वार्षिक सभेनंतर सभासदांच्या पाल्यांचा व सभासद पालकांचा सत्कार करण्यात आला. यात वेदांत निलेश राव 10 वी 81.60%, आई भाग्यश्री राव, स्वर्णिमा जोशी 10 वी 89%,आई वर्षा जोशी, प्रसाद प्रदीप नाईक 10 वी 94% आई वर्षा नाईक, कीर्ती किरण जोशी 12 वी 78.67% आई करुणा जोशी, श्रावणी वैभव बिंबे 12 वी 67.8%, आई वैष्णवी बिंबे, श्रावणी विकास नाखरे 12 वी 86.50% आई वैदेही नाखरे, अभिराम आनंद तारे, कराटे येलो बेल्ट, जिल्हास्तरीय कराटे कॉम्पिटिशनमध्ये सिल्वर मेडल आई रमा तारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधर्मा संस्थेतील खेडी, मन्यारखेडा, राजीव गांधी, समता नगर येथील 20 मुलांना रजिस्टर व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यापैकी 10 मुलांना मंडळाच्या सभासद मोनाली देसाई यांनी रजिस्टर व पेन वाटले. पंढरीच्या पायी वारी करून आलेल्या मंजुषा राव व मेघा नाईक तसेच केदारनाथ यात्रा करून आल्याबद्दल सुनीता सातपुते व अश्विनी जोशी यांचा मंडळातर्फे डॉ वैजयंती पाध्ये, सरोज वाडकर, उषा पाठक, चारुलता जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

दिपाली कुलकर्णी, अंजली धवसे, तनुजा पाठक यांनी विषय मांडले. सुनिता सातपुते, अश्विनी जोशी, मेघा नाईक, निलिमा नाईक, वैदेही नाखरे, ज्योती भोकरदोळे, सविता नाईक, अश्विनी जोशी, वैशाली कुलकर्णी व नवसाच्या गणपती मंदिर संचालक यांनी सहकार्य केले. सुधर्माचे गायत्री पाटील व नितिन तायडे आदी. यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंजुषा राव यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.