एस.पी. कार्यालयात दोन कुटूंबीय भिडले; हाणामारीत दोन जखमी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक कलहातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना आज पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयासमोर दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.  

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी , जामनेर तालुक्यातील वाकोद येथील तरूणीचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील तरूणाशी चार महिन्यांपुर्वी झालेला आहे. सुरूवातीचे दोन महिने संसार चांगला चालला. त्यानंतर दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर संबंधित तरूणीने जळगाव येथील महिला दक्षता समितीकडे  तक्रार दाखल केली. त्यानुसार आज तारखेला दोन्ही गटातील मंडळी पोलीस अधिक्षक कार्यालयात जमली होती. हेडकॉन्स्टेबल मनीषा पाटील, अभिलाषा मनोरे, एनपीसी संगीता पवार यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले. दक्षता समितीतील कामकाज आटोपल्यानंतर बाहेर पडल्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत फायटर सारख्या वस्तूचा देखील वापर झाला. हा प्रकार घडल्यानंतर येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व वाद मिटविला. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Protected Content