अंबाप्रिपी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोपसमारंभ

पारोळा (प्रतिनिधी) येथील ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संचलित कै. एच पी पाटील माध्यमिक विद्यालय अंबापिंपरी या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2018- 19 या वर्षात शिकत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला.

 

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री पी व्ही पाटील सर त्याचबरोबर श्री डीडी पाटील सर, सी.एच. माळी सर, के.जी.कचवे व एच.आर.लोहार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता आई सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. त्यात कृतिका पाटील, कोमल माळी, सोनाली वानखेडे, वैशाली पाटील, अर्चना पाटील, हर्षाली माळी, हर्षा माळी, दुर्गेश माळी, प्रितेश माळी इत्यादी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर श्री. माळी सर यांनी आपल्या मनोगतात इयत्ता दहावी ही जीवनातील पहिली पायरी असते व तिला सकारात्मक दृष्टिकोनातून जोड देऊन आपले आयुष्य आनंदी करू शकतो,असे सांगितले. श्री कचवे यांनी विद्यार्थी दशेपासूनच कोणत्याही पद्धतीचे व्यसनला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये आपण निर्व्यसनी असणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला दिला. त्याचबरोबर हेमकांत लोहार यांनी विद्यार्थ्यांना, पुस्तकांशी मैत्री करा असा मोलाचा सल्ला दिला. त्याचबरोबर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार असे मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात श्री. पाटील सर (मुख्याध्यापक) यांनी परीक्षेचे नियोजन, अभ्यासाचे नियोजन व व्यवस्थापन यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मयुरी माळी व वैशाली माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय भाऊसाहेब व एकनाथ लांडगे यांनी सहकार्य केले. सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले अशा पद्धतीने भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.

Add Comment

Protected Content