लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही : रेल्वेमंत्री

मुंबई । मुंबईची जीवनरेखा मानली जाणारी लोकलसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार कडून अद्याप प्रस्ताव आला नसल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

अनलॉक ५.० च्या माध्यमातून आता अजून काही घटकांना खुले केल्यानंतर उपनगरीय रेल्वे सेवा केव्हा सुरू होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विशेष करून मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी याच्या प्रतीक्षेत आहेत. यातच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी गौप्यस्फोट करत रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्

मुंबईतील पत्रकार परिषदेत मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्‍न त्यांना विचारला असता, मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे रेल्वे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल १५ तारखेपर्यंत सुरू करू असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अर्थात, यामुळे चाकरमान्यांना लवकर दिलासा मिळणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Protected Content