ना. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर

 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.7 जुलै रोजी अमळनेरात करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

सदर शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. यावेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्याना भेट वस्तू ही देण्यात येणार आहे.

यावेळी जीवनश्री रक्तपेढी अमळनेर व जीवन ज्योती रक्तपेढी धुळे यांच्या द्वारा रक्त संकलन करण्यात येणार असून शिबिराचे आयोजन नामदार दादासो अनिल भाईदास पाटील मित्र परिवाराने केले आहे.सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा व रक्ताची गरज लक्षात घेता हे शिबीर आयोजित केले असल्याने जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content