महिलेला मोबाईलवरून अश्लिल शिवीगाळ व धमकी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला एकाने मोबाईवरून फोन करून अश्लिल शिवीगाळ करत हात पाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी १ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी दुपारी अडीच वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावात ४५ वर्षीय महिला ह्या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी १ वाजता गावात राहणारा ललित पुंजू पाटील याने महिलेला यांना मोबाईल फोन करून सांगितले की, “तू सकाळी ज्या महिलेसोबत बोलत होती, तिच्या सोबत तू बोलायचे नाही. तिच्यासोबत माझे प्रेमसंबंध आहे”. त्यावर महिला म्हणाली की, “मी गावात सर्वच महिलांशी बोलते. कुठल्या स्त्री सोबत बोलू नको ते स्पष्ट सांग” असे सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी ललित पाटील याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिडीत महिलेने शनिवारी ४ मे रोजी दुपारी अडीच वाजता मारवड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ललित पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निमक हे करीत आहे.

Protected Content