गडकरी म्हणतात प्रत्येक पुलासही हवी ‘एक्सपायरी डेट’ !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशातील पुलांना कोणतीही ‘एक्सपायरी डेट’ देण्याची प्रक्रिया नसल्याने अपघात वाढत असल्याचे सांगत यापुढे पुलांना ‘एक्सपायरी डेट’ हवी असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नितीन गडकरी यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना रस्ते अपघात आणि सुरक्षेवर भाष्य केले आहे. यात ते म्हणाले की, आता वेळ आली आहे की, देशातील पुलांची एक्सपायरी डेट निश्चित करण्यावर निर्णय झाला पाहिजे. मी लोकांना नेहमी सांगतो की फायनान्शियल ऑडिट आवश्यक आहे, पण क्वालिटी ऑडिट आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी ऑडिट हे तितकेच महत्त्वाचे आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी जवळपास साडे चार लाख रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

रस्ते बांधणीत कार्बन स्टील आणि स्टील फायबर यांसारख्या नवीन सामग्रीच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, यावर नितीन गडकरी यांनी भर दिला. नितीन गडकरी म्हणाले, ”स्टील फायबर वापरणे हा अभिनव निर्णय आहे. स्टील आणि सिमेंट कंपन्यांच्या धोरणावर मी फारसा खूश नाही. रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणे, हे माझे एक ध्येय आहे.”

Protected Content