पॅरालिम्पिकमध्ये निषाद कुमार-प्रीती पॉल यांनी मिळवले पदक; पदकांची संख्या ७ वर

पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या निषाद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. त्याचवेळी प्रीती पाल हिने पॅरालिम्पिकमध्ये दुसरे कांस्य पदक जिंकले आहे. 24 वर्षीय निषादने तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत रौप्य पदक जिंकले होते. निषादने हंगामातील सर्वोत्तम 2.04 मीटर उडी मारली. सुवर्णपदक अमेरिकेच्या रॉड्रिक टाऊनसेंडने पटकावले. त्याने टोकियोमध्ये सुवर्णपदकही जिंकले होते.

निषादच्या पदकासह भारताची ॲथलेटिक्समधील पदकांची संख्या 3 झाली आहे. यापूर्वी पॅरिसमध्ये प्रीती पाल हिने महिलांच्या 200 मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. टोकियोमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताने 8 पदके जिंकली होती.

२३ वर्षीय प्रीती पाल हिने पॅरालिम्पिकमध्ये दुसरे कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रीतीने महिलांच्या 200 मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी तिने याच प्रकारात महिलांच्या 100 मीटर स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

Protected Content