ओरिऑन मुलींचा संघ बॅडमिंटनमध्ये विजयी

BATMINTON

जळगाव, प्रतिनिधी | के. सी. ई. सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलींच्या संघ बॅडमिंटन मध्ये विजयी झाला.

दि. २८ ते ३० ऑगस्ट या काळात म.न.पा. जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित जिल्हा स्तरीय आंतर शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये एकूण ९ संघ सहभागी झालेले होते. प्रथम सामना प्रगती विद्यालय यांचा सोबत झाला व अंतिम सामना पोतदार इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या सोबत झाला. अंतिम सामना १५-१० ऐवढया गुणांनी ओरिऑन चा संघ विजयी झाला. या विजयी संघात गारगी पाटील, निधी राणे, पायल रडे, नंदीनी शिंदे यांचा समावेश होता. हा संघ विभागीय स्तरासाठी पात्र झालेला असून दि. ५ सप्टेंबर रोजी नाशिक या ठिकाणी पुढील स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. विजयी संघाने मिळविलेल्या व त्यांची विभागीय स्तराला निवड झाली त्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जी. बेंडाळे, शाळेचे प्राचार्य संदीप साठे व शिक्षक शिक्षकेतर कर्मच्याऱ्यानी त्यांचे अभिनंदन केले. संघ विजयी होण्यासाठी राजेंद्र बढे, कोमल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content