चोपडा येथील निकुंभ विद्यालयाच्या दहावी निकालाची उज्जल परंपरा कायम

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सी.बी.निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा निकाल निकाल ८९.४७ टक्के लागला. यावर्षी दैदीप्यमान निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत ९५ विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी ८५ विदयार्थी उत्तीर्ण झाले. यात १९ विदयार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून सेमी इंग्रजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शालेय स्तरावर प्रथम हर्षदा शिवाजी पाटील (८८ टक्के), द्वितीय क्रमांक- मानसी योगेश पाटील (८२.८० टक्के), तृतीय क्रमांक -गायत्री युवराज पाटील (८२.२० टक्के) असे गुण प्राप्त करून तीन ही विद्यार्थिनींनी बाजी मारली. या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर.पी.चौधरी, पर्यवेक्षक एस.बी.अहिरराव, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content