धानोरा येथे १३२ के.व्ही.सबस्टेशन उभारण्यास मंजूरी

Mukhyamantri chopda news

चोपडा प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार लताताई सोनवणे यांनी चोपडा तालुक्याच्या काही समस्या मुख्यमंत्री यांच्यापुढे मांडल्यात.

यातील धानोरा येथे १३२ के.व्ही.सबस्टेशन उभारणे कामास मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजूरी दिली असून लवकरच धनोरा येथील १३२ के.व्ही.सबस्टेशनचा प्रश्न आमदार लताताई सोनवणे यांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाने खेडीभोकरी ते भोकर पूल उभारने, धुळे येथे नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे नवीन कार्यालय कार्यान्वित करणे, चोपडा मतदार संघातील रस्त्यांची कामे हायब्रीड अॅन्यूईटी अंतर्गत समावेश करणे, निम्न तापी पाडळसरे जिल्हा जळगाव या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून निधीची तरतूद करणे, चोपडा औद्योगिक विकास केंद्र मौजे चहार्डी, ता.चोपडा जि. जळगाव येथे विकसित करणे. चोपडा (जि.जळगाव) शहरातील पोलीस निवासस्थान बांधकामाच्या प्रस्तवास तातडीने मंजुरी देणे अशा असे महत्वपूर्ण मुद्दे यावेळी आ.लताताई सोनवणे यानी उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव यांनी सांगितले कि, धुळे येथील नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती कार्यालयाचा प्रश्न कर्मचारी पदभरती नंतर तर भोकर ते खेडीभोकरी पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. असे आश्वासन यावेळी दिले.

Protected Content