यावल पं.स.चे वरिष्ठ कक्षाधिकारी यांची लवकरच सेवानिवृत्ती

yawal news 7

यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समिती यावलमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ कक्ष अधिकारी म्हणुन कर्तव्य बजाविणारे तडवी हे आपल्या प्रदिर्घ सेवेतुन उद्या सेवानिवृत होणार असुन त्यांना यावल पंचायत समितीच्या माध्यमातुन त्यांचा निरोप संमारंभ आयोजीत करण्यात आला आहे.

यावल पंचायत समितीमध्ये मागील वर्षांपासुन कक्ष अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले लालखाँ महेबुब तडवी हे मुळ यावल तालुक्यातील हबर्डी येथील रहीवासी असुन, त्यांनी फैजपुर येथे डी.एन. कॉलेज येथे शिक्षण केले. १९८४मध्ये त्यांनी रावेर पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणुन आपल्या शासकीय सेवाकार्याला सुरुवात केली त्यांनी१३ वर्ष आपली सेवा दिली नंतर ते यावल पंचायत समितीला १० वर्ष नंतर मुक्ताईनगर येथे ७ वर्ष आणी यावल येथे मागील सहा वर्षापासुन ते वरिष्ठ कक्ष अधिकारी म्हणुन त्यांनी उत्तमरित्या आपली प्रशासकीय अधिकारी म्हणुन सेवा बजावली या आपल्या ३६ वर्षाच्या सेवेतुन लालखॉ महेबुब तडवी हे उद्या ३१ जानेवारी रोजी आपल्या प्रशासकीय सेवेतुन सेवानिवृत होत आहे.

Protected Content