चोपडा कॉग्रेसतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी एकता दिवस उत्साहात

chopda news 1

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहर व तालुका कॉग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 72 वी पुण्यतिथी एकता दिवस म्हणुन साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व महात्मा गांधीचा जयघोष केला.

या वेळी कॉग्रेस पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते व सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.जनशिक्षण संस्था चोपडा येथे झालेल्या या कार्यक्रमात चावरा इंटरनॅशनल स्कुलचे प्रिसीपल फादर सिजो, अॅड.संदेश जैन, रमेश शिंदे, महेबुब खा पठाण, इलीयाज पटेल समाधान सपकाळे , धारासिंग पावरा, चोपडा मार्केट कमेटीचे माजी सभापती सुरेश पाटील आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी प्रा. संदिप पाटील यांनी प्रास्तावीक केले. चोपडा तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष राजाराम बापु पाटील व शहरअध्यक्ष के.डी.चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.आपल्या मनोगतात त्यांनी महात्मा गांधी यांच्या महान कार्याचा गौरव केला.

सत्य,अहिंसा,सर्व धर्मसमभाव या मुल्यांना महात्मा गांधी यांनी स्वतः अंगीकारून अनेक अनुयानांना घडवले.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.महात्मा गांधीचे विचारच देशात शांतता व सुबत्ता आणु शकतात.महात्मा गांधी यांची पुण्यतिथी एकता दिवस म्हणुन साजरी करण्यात येते.महात्मा गांधी ही व्यक्ती नसुन एक विचार आहे.महात्मा गांधी मजबुरीचे नाही तर मजबुतीचे नाव आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा पुरस्कार करून देशाला स्वावलंबनाचा मुलमंत्र दिला. खरा भारत त्यांनी खेड्यातच आहे असे सांगितले.सत्याग्रह या शस्त्राचे महत्व महात्मा गांधीमुळेच जगाला कळले. महात्मा गांधीच्या जीवनपटाला मान्यवरांनी उजाळा दिला. या कार्यक्रमाला प्रा.नंदकिशोर सांगोरे, माजी नगरसेविका फातेमाताई, माजी उपनगराध्यक्षा सुरेखा माळी, विद्यार्थी कॉग्रेसचे अध्यक्ष चेतन बावीस्कर, मधुकर बावीस्कर, प्रा.प्रदिप पाटील, दिलीप जैन, समाधान सपकाळे व कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित हो

Protected Content