बोढरे येथील विद्यार्थ्यीनीचे शालांत परिक्षेत घवघवीत यश

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथील विद्यार्थी काजल चव्हाण हिने हालाखीच्या परिस्थितीवर मात करत दहावीच्या परिक्षेत ७७ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

चाळीसगाव येथील राष्ट्रीय कन्या विद्यालयात काजल अर्जून चव्हाण दहावीला शिक्षण घेत होती. ती सहा वर्षांची असताना आई देवाज्ञा झाल्या. तेव्हा पासून काजल आणि तिचा भाऊ बोढरे येथे आजी-आजोबाकडे राहतात. आजी-आजोबांची तशी हलाखीची परिस्थिती आहे. मात्र आपली भाची शिक्षण घेऊन खूप मोठी अधिकारी व्हावी, अशी त्यांची स्वप्न आहे. हेच स्वप्न साकार करण्यासाठी तिने दहावी वर्गात अफाट परिश्रम घेतले. त्याचबरोबर ती सांगते की, ही माझी यशाची पहिली पायरी आहे. अजून अनेक शिखर मला गाठायचे आहे. दहावीचे शिक्षण घेत असताना मला अनंत अडचणी आल्या. पुस्तक स्वत:जवळ नसायचे तेव्हा दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत असे. तसेच काही वेळेस माझ्या कडे पेन घेण्यासही पैसे नसायचे अशावेळी मी परिस्थितीस खूप कोसायचे किंबहुना शिक्षण सोडून द्यावा. असा विचार अनेकदा अंतर्मनात यायचा परंतु शिक्षण घेऊन मला काहीतरी व्हायचे आहे. ही जिद्द मला नेहमी प्रेरीत करत असे. आणि मी परत जोमाने अभ्यासाला सुरुवात करत असते. माझ्या या यशात रोटरी क्लबचे सदस्य सुभाष लक्ष्मण जाधव यांचा योगदान वाखाणण्याजोगा आहे. ते वेळोवेळी मला शैक्षणिक साहित्याची मदत करत असतात. आणि येथून पुढे ही हजारो हात माझ्या शैक्षणिक मदतीस सरसावले जातील. हा माझा आत्मविश्वास आहे.

Protected Content