मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे गाणे प्रदर्शित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे गाणे शेअर करण्यात आले आहे. गाण्याचे नाव दादाचा वादा असे आहे. गाणे चांगले असून लोकांना ते आवडेल अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या एक्स हँडवर देखील हे गाणे शेअर करण्यात आले आहे. सांगून आलोया थांबायचे नाय आता, जिंकायचे हाय म्हणजे जिंकायचे हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागे पुढे आता बघायचे नाय… धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा… जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता… असे गाण्याचे बोल आहेत.