यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी संबंधित जिल्हा परिषद शिक्षकांच्या विभागात कार्यरत असलेल्या संघाची यावल तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी श्रीकांत मोटे, उपाध्यक्षपदी गिरीश महाजन व जगदीश माळी, तसेच सरचिटणीसपदी ललित महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी प्रशासनीक व विविध प्रश्न सोडविण्यासाठी श्रीकांत मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये इतर पदाधिकारी म्हणून कार्याध्यक्ष आरीफ तडवी, कोषाध्यक्ष वसंत सोनवणे, विभागीय अध्यक्ष दीपक चव्हाण, संघटक अतुल चौधरी, प्रसिद्धी प्रमुख विपिन वारके, ज्येष्ठ मार्गदर्शक जितेंद्र फिरके, कुंदन वायकोळे आणि राजाराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी सदस्य म्हणून विक्रांत चौधरी, कैलास पाटील, संजू तडवी यांचा समावेश आहे. या संघटनेच्या संदर्भातील माहिती एका लिखित पत्राद्वारे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर आणि यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांना देण्यात आली आहे.