रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातून रावेरमार्गे फैजपूर येथे होत असलेल्या गुटखा तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करून सुमारे चार लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मुख्य आरोपी शेख जुबेर शेख इकबाल (रा. फैजपूर) अद्याप फरार आहे.
शुक्रवारी पहाटे रावेर शहरातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी गुटखा घेऊन जाणाऱ्या ॲपेचालकाला अटक केली होती. तर फरार असलेला आरोपी मुख्य आरोपी जुबेरच्या अटकेनंतर गुटखा तस्करीतील इतर साथीदारांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात असून, फैजपूरमध्ये तपास सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.