मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची एक्सिट होत आहे. ते नेते काँग्रेस सोडून भाजप किंवा शिवसेनेत जात आहे. आता यात एक नवीन नावाची भर पडली आहे. काँग्रेसचे मोठे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लातूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावेळी अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये येण्याचे कारण सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात अनेक मोठी कामे केली आहेत. विकासाच्या कामाने देशाची प्रगती झाली आहे.
मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणले. त्यामुळे राजकारणात येण्यापासून घाबरणाऱ्या महिलांना आता राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेश सोहळयावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकूळे उपस्थित होते. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी देखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हा या दोन्हीमध्ये चाकूरकर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. त्यामुळे लातूरमध्ये ऐन लोकसभा निवडणूकीवेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.