औरंगाबाद रेल्वे दुर्घटना : कामगारांसोबत होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेल्वे अपघातात मजूर भाऊ-बहिणींच्या मृत्यूच्या बातमीनं मी दुःखी आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांबरोबर होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.

 

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. हे सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ मजूर जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांनी या रेल्वे दुर्घटनेवरून नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असेही राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहेत.

Protected Content