काकाच्या घरावरच पुतण्याचा दरोडा; चार साथीदारही जेरबंद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी येथील स्वामी टॉवर येथे राहणार्‍या काकाच्या घरात १७ एप्रिल 2021 रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास दरोडा टाकणार्‍या पुतण्यासह टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात पाच जणांना अटक केली असून गुन्ह्यातील चारचाकी कार जप्त केली आहे. 

 

या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयित पुतण्या सनी इंदरकुमार साहित्या ( वय २५, रा. स्वामी टॉवर, ईच्छादेवी चौक), राकेश शिवाजी सोनवणे (वय ३५, रा.देवपूर, धुळे), उमेश सुरेश बारी (वय-२५, रा. चर्चच्या मागे, जळगाव), मयुर अशोक सोनार (वय ३५ रा. जळगाव) व नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार (वय ३४ रा. जामनेर) यांना अटक केली असल्याची माहिती आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. .

 

घरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात संशयित कैद झाले होते. त्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले होते. प्रकाश साहित्या यांच्या पुतण्या सनी याने हा दरोडा घडवून असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार ताब्यात घेतले, खाकीचा हिसका दाखविला. यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या नावे सांगत गुन्हा घडवून आणण्याची कबूली दिली. माहितीनुसार पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नरेंद्र वारुळे, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने एक-एक करत इतर पाचही संशयितांना अटक केली. या गुन्ह्यात संशयित राकेश सोनवणे याच्या मालकीची वापरलेली चारचाकीही जप्त करण्यात आली आहे. 

Protected Content