वरणगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी

Crime 1

वरणगाव प्रतिनिधी । येथील सिध्देश्वर नगरात लग्नाच्या वरातीत किरकोळ कारणा वरुन दोन गटात वाद निर्माण झाला होता. वादाचे परिणाम हाणामारीत होवून १३ जण जखमी झाल्याची घटना १४ शुक्रवार रोजी दुपारी २.३०वाजेच्या दरम्यान घडली होती. मात्र १७ सोमवार रोजी वरणगाव पोलिसात दोन्ही गटावर परस्पर गुन्हे दाखल केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिध्देश्वरनगरातील रहीवाशी सुरेश मराठे यांच्या मुलाचे लग्न ता. 14 रोजी सिध्देश्वरनगरात लग्न होते. त्यावेळी लग्नात निलेश काळे, जितू काळे, मुकेश काळे, रोशन काळे, एकनाथ काळे, किशोर काळे, गणेश पाटील, गजानन काळे, आंनदा धनगर, सोनाली राजपूत, सर्व राहणार सिध्देश्वरनगर, वरणगाव यांनी अंकुश माळी हा आम्ही सांगतो असे आमच्या मनाप्रमाणे वागत नाही असे म्हणून त्यास यांनी लाथाबुक्यांनी मारहान करुन शिवीगाळ करीत होते.

फिर्यादी रामदास माळी (वय 64) माझा नातू आकाश माळी याचा भांडणात आवाज ऐकू आल्याने मी व माझी सून पूजा माळी असे आम्ही दोघे भांडण सोडविण्यास गेले असता निलेश काळे यांने माझ्या डोक्यात उलटी तलवार मारली व त्याचा भाऊ मुकेश काळे यांने माझ्या छातीवर विट फेकून मारली तसेच गजानन वंजारी यांने माझ्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. यांनी गैर कायदयाची मंडळी जमवून मला व माझ्या नातेवाईकांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर तलावर हल्ला, लोखंडी रॉड, विटा अशा घातक हत्यारांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून रामदास माळी यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींवर दंगल घडवीण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तर भांडणातील दुसऱ्या फिर्यादीत गंजेंद्र काळे रा.सिध्दश्वरनगर यांच्या फिर्यादीवरून रोशन पाटील हा माझ्या घरासमोर उभा असतांना यास अंकुश माळी, लखन माळी, शांताराम माळी, पवन माळी, रामदास माळी हे भांडण करीत असतांना दिसले म्हणून त्यांचे भांडण सोडविण्यास मी गेलो असता अंकुश माळी यांने त्याच्या हातातील रॉड माझ्या डोक्याच्या मध्यभागीमारुन मला जखमी केले. तसेच वरील सर्व लोकांनी लाथाबुक्यांनी मारहान करीत जमीनीवर पडून रोशन यास लोखंडी पावडयाने मारहाण केली. म्हणून वरील आरोपींवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेतील दोन संशयीतांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश यांनी तीन दिवसाचा पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. तर वरिल दोन्ही घटातील संशयीत आरोपी अदयाप फरार असुन पोलिस शोध घेत आहे.
दोन्ही गटातील जखमीना वरणगाव ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वरिल घटनेचा तपास मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरसे, पीएसआय हर्षल भोये, सह्याक फौजदार सुनील वाणी करीत आहे.

Protected Content