शिरसाड खेथे जि.प. शाळेत मुक्ताईच्या पायी दिंडीच्या निमिताने विद्यार्थ्याना स्नेहभोजन

img 20200217 wa00433530873283909204573

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेत किनगाव ते मुक्ताई पायी दिंडी सोहळ्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता धनंजय पाटील व संपुर्ण पाटील परिवार यांच्याकडून प्रसादाच्या रूपात स्नेहभोजन देण्यात आले.

यावेळी शिरसाड ग्रामपंचायत सदस्य धनंजय एकनाथ पाटील, यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील, विविध कार्यकारी सोसायटी चे सचिव अरविंद खंबायत, साकळी केंद्रप्रमुख सर तसेच शाळेचे उपशिक्षक राजेंद्र अटवाल, शेख सर, राजाराम खजान मोरे, किशोर पाटील, अविनाश पाटील, अर्चना शिंदे व संपुर्ण पाटील परिवार आणी शिरसाड ग्रामस्थ मंडळी वा कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाचे गावकरी मंडळी यांनी स्वागत करून कौतुकही केले त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्नेहाभोजनाच्या निमित्त आनंद व्यक्त केला.

Protected Content