गोडसेल पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता होता : खासदार सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)   । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी नथुराम गोडसेल पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता होता, असा खळबळजनक दावा भाजपा खासदा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, गांधी यांच्या हत्येची नव्याने चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

नथुराम गोडसेने पिस्तुलाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ ला गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र नथुराम गोडसेला महात्मा गांधींच्या हत्येसाठी पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता होता असा खळबळजनक दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का करण्यात आले नाही? असाही प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

Protected Content