‘हर घर तिरंगा’ मोहिमेसंदर्भात भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त “हर घर तिरंगा” हा उपक्रम शासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, ३१ जुलै रोजी जिल्हा भाजपच्या वतीने बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत अभियान प्रदेश संयोजक आमदार योगेश सागर जी यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगरची बैठक पार पडली. बैठकीत “हर घर तिरंगा अभियान प्रदेश संयोजक ” आमदार योगेश सागर, माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे , खासदार रक्षा खडसे, माजी विधान परिषद आमदार स्मिता वाघ, हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक अशोक कांडेलकर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संयोजक योगेश सागर, गिरीश महाजन व उपस्थित आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी मनोगतात हर तिरंगा अभियान यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या. सण उत्सव ज्याप्रमाणे साजरे करतो, त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सण उत्सव समजून आप आपल्या परीने आपल्या गावात तालुक्यात हर तिरंगा अभियान राबविण्याचे आदेशही पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगतातून कार्यकर्त्यांना दिले.

धानवड येथील कार्यकर्त्यांचा माजी मंत्री महाराष्ट्राचे गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते माजी आमदार स्मिताताई वाघ भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभाकरआप्पा सोनवणे, प्रभाकर (मोठे भाऊ) पवार, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मधु काटे, संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी जिल्हा परिषद सभापती पोपट तात्या भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती मनोहर पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

 

Protected Content