हा तर शिवसेना संपविण्याचा प्रयत्न : उध्दव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकार शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करत असून यामुळे आम्ही झुकणार नसल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

 

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांना अटक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वीच ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बोलतांना या प्रकरणावर भाष्य केले होते. यात त्यांनी सध्या सुरू असलेला प्रकार हा महाराष्ट्राची नमकहरामी असल्याचा आरोप केला.

 

उध्दव ठाकरे म्हणाले की, आम्ही दिल्लीसमोर झुकणार नाही. मराठी माणसाचा अवमान करणार्‍या राज्यपालांच्या विरोधात वातावरण पेटत असल्याचे पाहून राऊत यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना अटक होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तर शिवसेनेला संपविण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचेही ठाकरे म्हणाले.

Protected Content