सुशांत आत्महत्या : बिहारच्या पाच पोलिसांविरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार !

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी कायदा मोडून स्वतंत्रपणे नियमबाह्य तपास केला. बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप केला, दादागिरी केली केली, अशी तक्रार बिहार राज्यातून आलेल्या पाच पोलिसांविरुद्ध मुंबईतील वांद्रा येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी आज बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये बिहार राज्यातील पाच पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी नोंदविलेला झिरो एफआयआर हा कायद्या प्रमाणे मुंबई पोलिसांकडे वर्ग (हस्तातंरण) करणे आवश्यक होते. सीआरपीसी कायद्यानुसार १२ व १३ नुसार सुशांतसिंह राजपूत याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार फक्त मुंबई पोलीस यांनाच कायदाप्रमाणे आहे. बिहारच्या पोलिसांनी महाराष्ट्र राज्य याची प्रतिमा मीडियावरुन खराब करण्याचा प्रयत्न केला म्हणून बिहार राज्यातील पाटण्याचे जे पोलीस अधिकारी मुंबई येथे आले होते. त्या पाच पोलिसांविरुद्ध भादवी कलम ३५२, ३५३, १८६ नुसार गुन्हा दाखल कारावा, अशी तक्रार महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

Protected Content