नेहरू चौकातील सिध्देश्वर पतपेढी कार्यालय फोडून लॅपटॉपची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेहरू चौकातील पतपेढीचे कार्यालय मध्यरात्री फोडून १२ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेहरू चौकात सिध्देश्वर पतपेढीचे कार्यालय आहे. २० ऑगस्ट रात्री ८ ते २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पतपेढीचे कार्यालय फोडून आत प्रवेश करत १२ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यासंदर्भात पतपेढीत नोकरीला असलेले केदार पदमाकर भोकरीकर रा. गुरूदत्त कॉलनी जळगाव यांनी मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहे.

Protected Content