जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेत मुलांच्या दोन्ही गटात गोदावरी विजयी, तर मुलींच्या गट उपविजयी ठरला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव,जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या स्पर्धेत १५ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले,१७ वर्षे मुलांच्या गटात गोदावरी स्कूल विजयी तर अँग्लो उर्दू हायस्कूल उपविजय ठरले, १७ वर्षा आतील मुलींच्या गटात जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय विजयी तर गोदावरी इंग्लिश स्कूल उपविजे ठरले. उद्घाटन समारंभ या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू नितीन बरडे यांच्या हस्ते व हॉकी जळगांवचे फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष हॉकी खेळून उद्घाटन करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ या क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभासाठी महिला बचत गटाच्या तथा महाराष्ट्र राज्याच्या बेटी बचाव बेटी पढाव च्या माजी समन्वयक प्रा. डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणून डॉ. अनिता कोल्हे, हॉकी जळगाव चे प्रमुख फारुख शेख, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, स्पर्धेचे क्रीडा समन्वय सय्यद लियाकत अली, गोदावरीचे क्रीडा संचालक प्रा. आसिफ खान, आदींची उपस्थिती होतीस्पर्धेचा निकाल१५ वर्षाआतील मुलेउपांत्य सामनाविद्या इंग्लिश स्कूल वी वी अंगलो उर्दू स्कूल (१-०) अंतिम सामनागोदावरी इंग्लिश स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (४-०)१७ वर्षाआतील मुलेउपांत्य सामना१) अंग्लो उर्दू स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०)२) गोदावरी इंग्लिश स्कूल वी वी मिल्लत उर्दू स्कूल (३-०)अंतिम सामनागोदावरी स्कूल वी वी अँग्लो उर्दू स्कूल (२-०)१७वर्षाआतील मुली१) गोदावरी स्कूल वी वी अँगलो उर्दू स्कूल (१-०)२) बेंडाळे कॉलेज वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०) पेनोल्टीअंतिम सामना३) बेंडाळे कॉलेज वी वी गोदावरी स्कूल (२-०) पेनल्टीत्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. क्रीडा मार्गदर्शक प्रा. आसिफ खान यांचे खेळाडुंना मार्गदर्शन लाभले.